सोलापूर : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाच्या खटल्यामधून संभाजी भिडे गुरुजी यांचे नाव वगळले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगाला याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सोलापूर दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी कोरेगाव-भीमा दंगली प्रकरणातून संभाजी भिडे गुरुजी यांचे नाव वगळण्यात आले आहे.
त्यांच्यावर कारवाई साठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बोलणार का असा प्रश्न विचारला असता या प्रकरणात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा काय संबंध, हा विषय राज्याचा आहे आणि यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून पण चौकशी आणि कारवाई साठी मागणी करू अशी भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडली.


















