सोलापूर : अन्न व औषध प्रशासनमार्फत उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे चहा पावडर जप्त करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अन्न प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी छापा टाकुन त्याठिकाणी जी. टी कंपनी, या पेढीची तपासणी केली असता तपासणीवेळी चहा पावडर मध्ये रंग वापरात असल्याचे आढळून आले.
या चहा पावडरचे ५ अन्न नमुने घेऊन उर्वरित साठा २२३० किलो, किंमत रुपये २लाख ४० हजारचा साठा जप्त करुन सदर पेढीकडे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. वरील अन्न पदार्थाचे नमुने अन्न विश्लेषकांकडे पाठविण्यात आलेले आहे. अन्न विश्लेषकांकडून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006, नियम व नियमने 2011 नुसार पुढील निर्णय घेण्यात येईल असे सहाय्यक आयुक्त प्रदिपकुमार राऊत यांनी सांगितले.



















