सोलापूर स्मार्ट सिटीचे सीईओ त्रिम्बक ढेगळे पाटील यांना शासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून पदमुक्त केले. सोलापूर महापालिकेच्या नव्या आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडे स्मार्ट सिटी सीईओ पदाचा पदभार देण्यात आला आहे. या पदावर शासनाने नवीन नियुक्ती अद्याप जाहीर केली नाही. त्रिंबक डेंगळे पाटील हे मागील दोन वर्षापासून स्मार्ट सिटी योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी काम पाहत होते.
स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा पदभार आयुक्त तेली-उगले यांच्याकडे आला असून ते आता येणारे आठ दिवस रजेवर असल्याची माहिती समोर आली आहे यामुळे सोलापूर महानगरपालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटी सीईओ ही दोन्ही पदभार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे येणार आहेत.


















