दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे बुधवार, दि. ०३ मार्च रोजी सकाळी ०८ वा च्या दरम्यान सुरेश बबन गायकवाड (वय २६ वर्षे, रा. भिमनगर, मुळेगाव,) या युवकाच्या हत्येप्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही हत्त्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा उकल करण्यात जिल्हा ग्रामीण पोलिसांना यश आले असून केवळ १२ तासाच्या आत आरोपीस गजाआड करण्यात यश आले आहे.
या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरिता सोलापूर तालुका पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार याचे विशेष पथक गठीत करण्यात आले होते. गुन्ह्याच्या घटनास्थळी डॉग स्कॉड व फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आले होते. गुन्ह्याच्या तपासादरम्यान गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार गुन्हयातील मृत सुरेश गायकवाड याचा गावातील एका इसमाशी वाद झाला होता, हे पुढे आले.
त्यावरून त्या इसमाचा शोध घेऊन त्याच्याकडे कौशल्याने विचारपूस केली असता, मयत सुरेश गायकवाड यास मुळेगाव ते बिस्मील्लानगर असे चालत घेऊन गेले. तेथून मौजे मुळेगाव येथील रामचंद्र बिराजदार यांच्या शेतामध्ये गेल्यानंतर, मागील भांडणाचा राग मनामध्ये धरून सुरेशचे डोके दगडावर आपटून खून करून शेतातून व झाडा-झुडपातून पसार झाला, या आरोपीस गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास जगताप हे करीत आहेत .
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सपोनि नेताजी बंडगर , मसपोनि माधुरी तावरे, सहाय्यक फौजदार गायकवाड, नासिर शेख, पोलीस हवालदार सुनिल बनसोडे, फयाज बागवान, पोलीस नाईक अनिस शेख, पोलीस कॉन्स्टेबल शशि कोळेकर, बिराजदार, देवा सोलंकर, अशोक खवतोडे, शंकर मुजर्गोंड, राजु इंगळे, रवि हटकिळे नेमणूक सायबर पोलीस यांनी पार पाडली.



















