दरवर्षी 1 मे महाराष्ट्र दिन निमित्ताने शाळेत ध्वजारोहण होते.शैक्षणिक वर्षाच प्रगतीपुस्तक देण्यात येते. यंदाच्यावर्षी शाळा सुरू झाल्या नाहीत. ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्याना शाळेची आठवण होते. वर्गातील मित्र-मैत्रिणीची भेट झाली नसल्याने निराश झालेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून शाळा सुरू करा, आम्ही मास्क वापरू, अंतर ठेवून वर्गात बसतो अशी विनंती करीत इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या गाथा विनोद कामतकर हिने आज एक मे महाराष्ट्र दिन निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी पत्र लिहून यंदाच्या शैक्षणीक वर्षांपासून शाळा सुरू करण्याच आवाहन केलं.
गाथाने स्वतः लिहिलेलं पत्र तिच्याच अक्षरात…✒️



















