मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरातील छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळेस शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहर समन्वय दिलीप कोल्हे आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर पत्रकारांशी बोलताना सोलापूर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या कार्याचे उद्घाटन केले. सर्व कार्यकर्त्यांना भेटलो शुभेच्छा मिळाल्या, शुभेच्छा दिल्या पंढरीतील आषाढी वारीची मोठी नियोजन केले आहे. माझ्या आयुष्यातील फार मोठा आनंदाचा क्षण आहे. भाग्याचा दिवस आहे. आषाढी वारी निमित्त पांडुरंगाचे पूजा करण्याचा मान मला आणि माझ्या कुटुंबाला मिळाला तमाम राज्यातील लाखो वारकऱ्यांना मिळतंय ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. शेतकरी कष्टकरी आपला मायबाप बळीराजा संकटातून मुक्त होऊ दे सगळ्या राज्याला सुकलाम सुकलाम होऊ दे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ दे हेच पांडुरंगाला साकडं असेल असे सांगितले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या विषयी प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांसमोर हात जोडून बोलण्यास नकार देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर कडे रवाना झाले.


















