सोलापूर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सर्व ओढे नाले आणि नदीला पूर आला आहे यामध्ये विशेष करून सीना नदी दुथडी भरून वाहत असून अनेक रस्ते, बंधारे पाण्याखाली गेले आहेत, उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी वरून राळेरास गावाला जाणारा रस्ता ओढ्याला पूर आल्याने बंद झाला आहे रस्त्यावरून सुमारे दोन फूट पाणी वाहत असल्याने कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.या सीना नदीकाठचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली असून नदीकाठचे हत्तुर वडकबाळ राजुर बंदगी संगवड औराद अशा अनेक गावांमधील शेतांमध्ये पाणी शिरले आहे नदीचा प्रवाह प्रचंड असून पाणी वाढत जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक देवकते यांनी याबाबत नदीकाठच्या गावांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी असे आवाहन केले……


















