मार्डी -श्री समर्थ काेचिंग क्लासेस व वेदिका महिला स्वयंसहाय्यता समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सीआरपी रोहिनी जगताप व अपर्णा देशमुख यांच्या हस्ते जिजाऊ मॉसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
समर्थ कोचिंग क्लासेस ची विद्यार्थिनी अपूर्वा कांबळे यांनी राजमाता जिजाऊ मॉसाहेब बद्दल सर्व उपस्थितांना मंत्र मुग्ध केले. तसेच जानवी जाधव ,जानवी जगताप, आम्रपाली जाधव, तोहरा तांबोळी या पाच विद्यार्थिनींनी जिजाऊ मॉसाहेब यांची वेशभूषा परिधान केलेली होती. सीआरपी अपर्णा देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
वेदिका महिला स्वयंसहायता गटाच्या अध्यक्षा अनिता भिंगारे सचिवा रेश्मा कदम, बिस्मिल्ला कुडले ,मंगल स्वामी, रुक्मिणी शिंदे, अन्नपूर्णा डांगे, राजश्री जाधव, श्रद्धा जाधव, आरती कदम व क्लासेसच्या विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते.
मार्डी तालुका उत्तर सोलापूर येथील
संत वीरशैव कक्कय्या समाज मंदिरात निर्मल हृदय युवा प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी सकाळी स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन पाकणीच्या सरपंच सौ. शोभा गुंड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुनील गुंड, बाजार समिती संचालक नामदेव गवळी, संजय खरटमल, विठ्ठल नारायणकर, भगवान तात्या कदम, पिंटू विभुते, वैष्णवी खरटमल, सुयश खरटमल,विजय साठे उपस्थित होते.
मार्डी ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन घे भरारी महिला ग्राम संघाच्या कोषाध्यक्ष वृषाली पवार व जगन्नाथ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घे भरारी महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा जनाबाई इनामदार, ग्राम विकास अधिकारी प्रवीण विभुते, विष्णू जगताप, सैपन पटेल, जगन्नाथ पवार, अपर्णा देशमुख ,हजरत जहागीरदार, सुनील जाधव, शत्रुघ्न गोडसे,विनोद जगताप गणेश व्यवहारे, अमजद पठाण, कुंडलिक बोराडे, अनिल हजारे बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
















