सोलापूर : बेकायदेशीर मान्यता दिल्याप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर हे आता तब्बल 15 दिवस जात आहेत. आता त्यांचा चार्ज मिळविण्यात कोणत्या उपशिक्षणाधिकारी बाजी मारतात याकडे संपूर्ण जिल्हा परिषदेचे लक्ष लागले आहे.
शिक्षणाधिकारी बाबर यांनी आपल्या रजेचे पत्र सामान्य प्रशासन विभागाला दिले असल्याचे समजले. एक तर ते दहा ते पंधरा दिवस दिवस कार्यालयात नसतात अशातच आता त्यांनी रजा घेतली आहे. आता प्रशासन माध्यमिक विभागातील उपशिक्षणाधिकारी सुलभा वटारे की सुधा साळुंखे या पैकी कुणाला 15 दिवस पदभार देतात हे मंगळवारी स्पष्ट होईल.