सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांच्याकडे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याचा प्रभारी चार्ज देण्यात आला आहे. शेख यांची सोमवारी ऑर्डर काढण्यात आली होती. मंगळवारी पदभार स्वीकारला.
बुधवारी ते दिवसभर माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात ठाण मांडून होते, टप्पा अनुदान आणि शिक्षक मान्यतेच्या त्रुटीबाबत फायली तपासल्याचे पहायला मिळाले. शिक्षक संघटनांच्या अनेक नेत्यांनी त्यांची कार्यालयात भेट घेतली.
सोलापूर जिल्हा परिषदेचे तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य प्रा. सुभाष माने, सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा.तानाजी माने, सचिव बापूसाहेब निळ, संघाचे नियंत्रक समिती सदस्य कट्टे, सहसचिव कुलकर्णी, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी अमोल चव्हाण, मेटकरी, लक्ष्मणराव शिंगाडे, अशोक यलमार व इतर मान्यवरांनी भेट घेऊन शिक्षणाधिकारी शेख यांचा सत्कार केला. यासह शिक्षक मान्यतेवर काढलेल्या त्रुटींवर बराच वेळ चर्चा केली. अनेकजण कार्यालयातून समाधानाने बाहेर पडल्याचे पहायला मिळाले.



















