सोलापूर : जिल्हा परिषदेचे जेष्ठ नेते बळीराम काका साठे यांना एका महिलेने येणारी पत्र पाठवले त्यामध्ये प्रभारी गटशिक्षण अधिकारी बापूसाहेब जमादार यांचा उल्लेख आहे या पत्रामुळे शिक्षण विभागात पुन्हा खळबळ उडाली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी या प्रकरणात दोन्ही बाजू समजून घेऊ आणि त्यानंतर निर्णय घेऊ अशी माहिती पत्रकारांना दिली. पत्राची बातमी प्रसिद्ध होताच जमादार यांनी मला निनावी पत्र, माहिती अधिकारद्वारे सामाजिक संघटना त्रास देत आहेत. त्यांना प्रतिबंध करावा असे पत्र तात्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दिले होते. दरम्यान या पत्रात जमादार यांनी काय लिहिले ते पहा..
मी वरील विषयी विनंती करतो की, आम्ही शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेमार्फत अधिकाऱ्यांवर झालेल्या असंविधानिक भाषा वापरून अवमान केल्यामुळे जाहीर निषेध करून दि. २२.०८. २०२२ रोजी कामबंद आंदोलन पुकारले होते त्याचा रोष मनात धरुन काही संघटना व माहिती अधिकार कार्यरते, दलाल, ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांमार्फत माझी वैयक्तिक माहिती मागणी करुन खोट्या तक्रारी करीत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. तरी अशा खोटया तक्रारी अर्ज करणाऱ्या बेकायदा संघटना व व्यक्तीवर कडक कारवाई करावी, ही नम्र विनंती
तसेच माहिती अधिकारामध्ये वैयक्तिक स्वरुपाची माहिती शासन निर्णयानुसार देता येत नाही. वैयक्तिक स्वरुपाची माहिती दिल्याने त्याचा उपयोग विधायक कार्यासाठी त्याचा वापर होण्यासाठी शक्यता नाकारता येत नाहीत स्वरुपाचा धोका होऊ शकतो. निनावी खोटे अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध प्रतिबंध करावा व कायदेशीर कारवाई करावी, ही विनंती



















