सोलापूर : जगभरात आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी होत आहे. सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सकाळी सहा वाजल्यापासून भीम अनुयायांची अभिवादनासाठी गर्दी झाली होती.
यावेळी रॅपर विनायक विश्वकर्मा यांनी महामानव डॉक्टर आंबेडकरांवर तयार केलेले “माझ्या भीमाची जयंती हाय…,त्यांनी दिला आम्हाला न्याय” हे रॅप सॉंग सर्वांसमोर सादर केले.. यावेळी उपस्थितानी भरभरून दाद दिल्याचे पाहायला मिळाले.

















