सोलापूर : राष्ट्रवादीमध्ये असलेले माजी महापौर महेश कोठे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आता आपण शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे अशी माहिती देताना पक्षाबाबत त्यांनी संभ्रम ठेवला आहे. जो पक्ष आपणाला उमेदवारी देईल त्या पक्षाकडून शहर उत्तर विधानसभा लढवेन असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून ही आपणास ऑफर असल्याचे सांगताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोठ्या विश्वासाने आपणावर सोलापूरचे जबाबदारी दिली आहे. अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना मोठा निधी देऊन मदत केली. त्यामुळे आपली राष्ट्रवादीत वाटचाल चांगली सुरू आहे मात्र काहींना ते खपत नाही असा चिमटा ही त्यांनी पक्षातील विरोधकांना काढला. नक्की महेश कोठे काय म्हणाले पहा हा व्हिडिओ


















