सोलापूर : महाराष्ट्र कामगार सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक गवळी यांना तडकाफडकी पदावरून काढण्यात आल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी 5 एप्रिल रोजी गवळी यांना दिले.
कारमपुरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, 19 नोव्हेंबर 2022 रोजी दीपक गवळी यांची कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती. निवड झाल्यापासून संघटना वाढीचे व संघटना हीताच्या दृष्टीने गवळी यांनी कोणतेही काम केले नाही तसेच आपल्या कार्यालयावर अजूनही कामगार सेनेचा फलक लावला नाही केवळ संघटनेचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करत असून हे कृत्य चुकीचे व गैर आहे असे सांगितले आहे.
हे पत्र हातात पडताच दीपक गवळी यांनी आपले स्पष्टीकरण दिले. निवड झाल्यापासून कामगारांच्या हितासाठी आपण प्रश्न उपस्थित केले आंदोलन केले त्याची माहिती प्रदेशाध्यक्ष कारमपुरीं यांना वारंवार दिली आहे असे सांगतानाच त्यांनी विष्णू कारमपुरी यांच्यावर लँड माफियांशी हात मिळवणी करून आर्थिक तडजोड केल्याचा आरोप केला आहे.



















