नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदी सरकारमधील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेस सोडलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांना गिफ्ट मिळाले असून नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आलीय, गुजरातमधील मनसुख मांडवीय यांच्याकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालय आता अश्विनी वैष्णव यांना, कपिल पाटील पंचायत राज्यमंत्री, भारती पवार आरोग्य राज्यमंत्री, भागवत कराड अर्थ राज्यमंत्री तर आपले दाजी रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री झालेत. पाहूयात कुठल्या मंत्र्यांकडे कुठले खाते देण्यात आले आहे.






















