सोलापूर महापालिकेच्या तहकूब सभेत तातडीचे प्रस्ताव का सादर करून घेतात असा सवाल उपस्थित करताच महापौरांनी सोमवारी बोललेली पालिकेची सर्वसाधारण सभा दुखवट्याचा प्रस्ताव सादर करत सभा तहकूब करत असल्याची घोषणा केली.
सोमवारी महापौर श्रीकांचना यन्नम सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती पालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब होणार असल्याने बहुतांश सर्वपक्षीय सदस्यांनी सभागृहात अनुपस्थितीत जाणवत होती सभा संकेताप्रमाणे राष्ट्रगीत झाले, यानंतर महापौर आसनस्थ होताच नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी काही नगरसेवकांच्या तातडीचा प्रस्ताव सभेपुढे आले आहेत ते घेऊ का अशी विचारणा महापौरांकडे करताच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी तातडीचे प्रस्ताव सादर करून घेण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली
जवळपास दीडशे प्रस्ताव नगरसचिव कार्यालयात पडून आहेत ते प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेतले जात नाहीत पण आर्थिक लाभाचे प्रस्ताव तातडीने सादर करून घेण्याची पद्धत चुकीची आहे असं म्हणत काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी महापौरांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
शहराच्या विकासाला प्राधान्य देत महापौरांनी प्रस्तावाची वर्गवारी ठरवणे गरजेचे आहे पण तसे होताना दिसत नाही महापौर वारंवार अशा पद्धतीने तातडीचा प्रस्ताव सादर करून घेणे योग्य नाही असं म्हणत तोफिक शेख यांनी महापौरांच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त केला .
दरम्यान महापौर श्रीकांचन यन्नम यानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस आणि उपमहापौर राजेश काळे आईच्या निधनाचा दुखवण्याचा प्रस्ताव सादर करत पालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली.


















