जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान कार्यालय येथे बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी श्री महात्मा बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बैठकीला सुरुवात झाली. यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष चिदानंद वनारोटे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.
सर्वानुमते 2023 चे उत्सव समितीचे अध्यक्ष पदावर सचिन शिवशक्ती व कार्याध्यक्ष मनीष काळजे तर उपाध्यक्षपदी संतोष केंगनाळकर यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सचिन शिवशक्ती यांचे माजी अध्यक्ष गिरीश किवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नूतन उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचाही महामंडळाचे संस्थापक चिदानंद वनारोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महामंडळाचे ट्रस्टी आनंद मुस्तारे, वीरेंद्र हिंगमिरे, अनिल परमशेट्टी, जगदीश पाटील, केदार उंबरजे, एडवोकेट मल्लिनाथ राचेटी, गणेश चिंचोली, गुरुशांत मोकाशी, गौरीशंकर जाक्कपुरे, मल्लिनाथ सोलापुरे, अमोल साखरे यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी व बसप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते




















