सोलापूर : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना व मानवता संयुक्त संघाच्या विद्यमाने संघटनेत काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान सोहळा मंगळवारी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाला. अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, संघटनेचे अध्यक्ष राजा माने, संयुक्त संघाचे संघटनमंत्री डॉ विजयकुमार केसकर, जिल्हाध्यक्ष विजय थोरात, उपाध्यक्ष विश्वजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, शहराध्यक्ष प्रशांत कटारे, सचिव रामकृष्ण लांबतुरे, कार्याध्यक्ष परशुराम कोकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले, पत्रकार हा प्रशासकीय जीवनातला अविभाज्य भाग असल्याचे सांगत आज लोकशाहीचा चौथा स्तंभ विस्तारत चालला आहे, उद्याची बातमी आज आणि आता लगेच वाचायला मिळत असली तरी डिजिटल मीडियाच्या जमान्यात बातमीची विश्वासार्हता महत्वाची असल्याचे सांगत त्यांनी मजेदार किस्से सांगितले.
अजयसिंह पवार म्हणाले, डिजिटल माध्यमांनी बातमी सोबतच कृषी, आरोग्य या विषयीच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन केले.
डॉक्टर विजयकुमार केसकर व विजय थोरात यांनी मानवता संयुक्त संघाच्या वाटचालीचा आढावा देत डिजिटल मीडिया सोबत काम करण्याची भावना व्यक्त केली. संघटनेचे कार्याध्यक्ष परशुराम कोकणे यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या सोलापूर शाखेच्या वाटचालीचा आढावा सांगितला सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी तर आभार इमरान सागरी यांनी मानले.
■ या पत्रकारांचा झाला सन्मान ■
राजा माने सर, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, विजय कोरे सर, टिंकू पाटील, मारुती बावडे, विनोद ननावरे, विजय पर्वत, विजय चव्हाण, विजय कांबळे, बालाजी शेळके, पोपट इंगोले, दिनेश मडके, अर्जुन गोडगे, अनिल जगताप, शहराचे अध्यक्ष प्रशांत कटारे, सचिव रामकृष्ण लांबतुरे, कार्याध्यक्ष परशुराम कोकणे, सहसचिव शाहनवाज शेख, सदस्य इम्रान सगरी, विक्रम इंगळे, मनोज भालेराव, एस बी गड्डम, जहुर सय्यद, सोमनाथ शिंदे, मुकुंद उकरंडे, रत्नदीप सोनवणे, यासिन शेख, शिवाजी सावंत, सचिन जाधव, सचिनकुमार जाधव, अमोगसिध्द व्हनकोरे, राजेश भोई, रविंद्र जोगीपेठकर, चंदन बोळळू, शरद पोतदार, गणेश शिंदे, अशोक कांबळे



















