सोलापूर : जागतिक जल दिनाच औचित्य साधून अटल भूजल योजना आणि जल जीवन मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सभागृहात पाण्याबाबत जनजागृती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, वरीष्ठ भुवैज्ञानिक मुश्ताक शेख, कार्यकारी अभियंता कोळी, पंडित भोसले, सुनील कटकधोंड, शाहीर रमेश खाडे, ड्रीम फाउंडेशनचे काशिनाथ भतगुणकी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सीईओ स्वामी यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले, पूर्वी पाण्यासारखा पैसा खर्च केला अशी म्हण प्रचलित होती मात्र आता पैशासारखे पाणी खर्च करावे लागणार आहे. इस्राईल या देशात पैशा सोबत पाण्याचे बजेट तयार केले जाते. आजची गरज पाहता भारतात सुद्धा भविष्यात पाण्याचे बजेट तयार करावे लागेल पाण्याची बचत, वापर आणि निर्मिती ही याचे जर नियोजन नाही केले तर सर्वत्र वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही असा धोका व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या हजारो शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्लांट बसवण्यात आला आहे, रंगपंचमी सणानिमित्त पाण्याची बचत होण्यासाठी नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळा घेतली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान त्यांनी पाण्याचं महत्व सांगताना सीईओ स्वामींनी मजेदार किस्सा सांगितला पहा तो काय होता…
प्रारंभी उपस्थितांना जल साक्षरतेची शपथ देण्यात आली. शाहीर खाडे यांनी जल जनजागृतीवर पोवाडा सादर केला.अजयसिंह पवार, मुश्ताक शेख यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकांदे यांनी मानले.
सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...