सोलापूर : मग्रारोहयो अंतर्गत कार्यरत सहा कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहा. क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी 18 जानेवारी रोजी काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. सोमवारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र सहा. कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहा, क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूरच्या वतीने प्रशासनाला इशारा निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष अजिंक्य साखरे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल गायकवाड, जिल्हा सचिव विशाल कुंभार यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
या आहेत मागण्या…
मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीमध्ये समायोजन करण्यात यावे.
पच्छिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे.
योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्य निधी असोसिएशन मध्ये नियुक्ती देण्यात यावी.
ग्राम रोजगार सेवक यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात यावे.
मध्यप्रदेश शासन प्रमाणे वयाच्या ६२ वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी.
अशी आहे आंदोलनाची दिशा..
दिनांक १८.०१.२००३ रोजी महाराष्ट्रात एक दिवसीय संप पुकारण्यात येईल. मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक २५.०१.२०२३ पासून असहकार आंदोलन करून लेखणी आढावा सभा, अहवाल Online ची कामं करण बंद करण्यात येतील. मागण्या पूर्ण न झाल्यास
दिनांक ०१.०२.२०२३ पासून बेमुदत संप पुकारण्यात येईल.