सोलापूर : जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी कवडे, तालुका कृषी अधिकारी आर.एस. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुप येथील माळकवठे रोडवरील जेऊरकर वस्ती येथे लोकसहभागातून वनराई बंधारे करण्यात आले..
सन 2022-23 या वर्षात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात झाले आहे त्यामुळे ओढे-नाले यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे सध्या पावसाळा संपत आल्याने ओढे – नाले यामधील वाहून जाणारे पाणी अडवून पिकांना संरक्षित सिंचन देणे तसेच जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात आले.
बिगर पावसाळी हंगामातील पाण्याची गरज भागविण्यासाठी उपलब्ध साधनांचा सिमेंट रिकामे पोते वापर करून बंधारा बांधण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मंद्रुपचे कृषि सहाय्यक रमेश फरताडे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने वनराई बंधारा बनवून घेतले.
यावेळी शेतकरी काशिनाथ जेऊरकर, पत्रकार बबलु शेख, पत्रकार गजानन काळे, युवराज साठे, केदार जोडमोटे, शिवानंद आडोळे, महादेव कांबळे, विठ्ठल डोमनाळे, विजय हजारे, मल्लू अडोळे या शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले..



















