सोलापूर – सोलापूर जिल्हा तसा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. विकासाच्या दृष्टीने निसर्गाच्या अवकृपे सोबत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव देखील आहे. मात्र विकासाची दृष्टी आणि विकासाचे ध्येय असणाऱ्या महाविकास आघाडीचे व अखिल भारतीय किसान सभा पुरस्कृत अरळी ग्रामपंचायतचे अजय सगट व मंद्रुपचे सरपंच अनिता कोरे या विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या. हे नक्कीच अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे. ग्रामपंचायतचा विकास करत असताना प्रत्येक निधीतून आलेल्या पैशाचा वापर हा गावाच्या सर्वांगिण विकासाठीच झाला पाहिजे याची जाणीवपूर्वक काळजी घेणे ही नैतिक जबाबदारी असून ते पार पाडण्याची क्षमता आपल्यात आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी काढले.
नुकतेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मंद्रुप ग्रामपंचायत येथे राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय किसान सभा, शिवसेना गट पुरस्कृत लोकनेते गोपाळराव कोरे ग्रामविकास आघाडी पॅनल याचे प्रमुख आप्पाराव कोरे माजी जि.प.सभापती नेतृत्वाखाली व डॉ.शिवानंद झळके किसान सभा जिल्हाध्यक्ष यांच्या परिश्रमातून मंद्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अनिता तुकाराम कोरे या 3747 एकूण मतदान 930 मताधिक्याने निवडून आले. तसेच
ग्रामपंचायत सदस्य :-
१) रेहाना गफूर शेख(सदस्य)
२) यासीन मकानदार(किसान सभा)
३) शकुंतला मळसिद्ध शीळ्ळे यांच्यासह गटाचे सात ग्राम सदस्य म्हणून निवडून आले.
अरळी ग्राम पंचायत तिसरी आघाडी ग्रामविकास पॅनल
पॅनल प्रमुख :- काशिनाथ रगबले यांच्या नेतृत्वाखाली
सरपंच :- अजय सगट
1500 एकूण मतदान 36 मताधिक्याने निवडून आले.
ग्रामपंचायत सदस्य :-
१)सुरेखा राजेंद्र स्वामी
२)सुरेखा शिवानंद धुम्मा
३)केशरबाई शंकर कुंभार
४)शहजाद मोदिन चौधरी
या सर्व नवनिर्वाचित सरपंच व ग्राम सदस्यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शनिवार दिनांक 31 डिसेंबर रोजी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी अभिनंदन पर शुभेच्छा व्यक्त करताना माकपचे जिल्हा सचिव कॉ.अँड.एम.एच.यांनी आज देशातील सत्ताधारी सरकार शेतकऱ्यांना हवालदिल केलेला. शेती मालाला हमीभाव नाही, पीक विमा नाही, नुकसान भरपाई नाही, कोणतेही संरक्षण नाही केवळ जाहिरातबाजी वर लक्ष केंद्रित केले असून शेतकरी देशोधडीला लागला याची चिंता वाटत नाही ही मोठी शोकांतिका आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे. याची सुरुवात ग्रामपंचायत निवडणूकीतून आपण केलेला आहे. हे अधिक बळकट करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपल्या सोबत आहे. अशा शब्दांत अभिनंदन करत शुभेच्छा दिले.
यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय नेते कॉ.सिद्धप्पा कलशेट्टी, कामगार नेते माजी नगरसेवक कॉ.व्यंकटेश कोंगारी आदींनी शुभेच्छा दिले.
जावेद आवटे, सिकंदर मकानदार, ईकबाल आवटे, हारुन मकानदार, सूर्यकांत कुंभार, किशोर मेहता, दीपक निकंबे, रवींद्र गेंट्याल, शाम आडम आदी उपस्थित होते.

















