कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प सभेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजावर जोरदार टीकास्त्र सोडले. चर्मकार समाजाचा चपलांचा धंदा आहे धर्म नाही. सुतारकाम करणे हाही धंदा आहे धर्म नाही. तसा ब्राह्मणांचा पौरोहित्य करणं हा धंदा आहे धर्म नाही असा जोरदार टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.
देवळात जाण्याचं आरक्षण फक्त तुम्हाला आहे का? अशी विचारणा करतानाच अरे द्याना आम्हालाही शिकायला. आमचा सर्वसामान्य माणूस शिकू दे ना समरपयामी. अशी मिश्किल टीकाही छगन भुजबळ यांनी केली.



















