सोलापूर : मंगळवेढा जय भवानी सोसायटी या ठिकाणी राहणाऱ्या वडार समाज बांधवांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला. वडार समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्यांमध्ये मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य हिंदुस्थानी यांच्यासह किरण घोडके, संजय चौगुले, दिगम्बर धोत्रे, दत्ता पवार, नागनाथ पवार, संतोष दांडेकर, गणेश पवार, रवींद्र पवार हे सहभागी होते.
यावेळी बोलताना पवार व हिंदुस्थानी म्हणाले, मंगळवेढ्यात जय भवानी सोसायटी आहे मात्र या सोसायटीचा समावेश ना कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये आहे ना मंगळवेढा नगरपालिकेमध्ये आहे त्यामुळे आम्हाला कोणत्याही नागरिक व मूलभूत सुविधा मिळत नाहीत मग आम्ही भारतीय नाहीत का? आमच्या लोकवस्तीला वेगळ्या देशाची मान्यता देणार का? असे प्रश्न उपस्थित केला…


















