मंगळवेढा : मंगळवेढा सोलापूर रोड (Manglvedha Solapur Road) जवळ समोरासमोर दोन वाहनांची जोराची धडक होऊन दोघे जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजता मंगळवेढा कडून पंढरपूर बायपास संत दामाजी कारखान्याच्या रोडच्या जवळ घडली आहे.
सोलापूर हुन येणाऱ्या ईरटीका (MH10DQ4760) आणि सोलापूर कडे जाणाऱ्या टेम्पोचा (MH09EM4660) समोरासमोर जोराची धडक होऊन हा अपघात झाला. मयत व जखमी हे सर्व उमदी तालुका जत येथील असून उमदी गावातील सहा जण इस्तमासाठी औरंगाबाद येथे तीन दिवसापूर्वी गेले होते ते हा कार्यक्रम संपवून रात्री उमदी गावाकडे परतत असताना हा अपघात झाला आहे. यामध्ये जैनुद्दिन काशीम यादगिरे वय 40 रा उमदी ता जत व मौलाना साजिद खान वय 45 मुंबई भिवंडी सध्या उमदी हे दोघे जण जागेवरच मयत झाले असू यामध्ये इरटीका गाडीचा चक्काचूर झाला आहे. चारही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

















