मंगळवेढा | नंदेश्वर येथील फुलाबाई गरंडे वय 60 या वृद्ध महिलेस तिचा मुलगा वारंवार शेतजमिनीची बेकायदेशीर मागणी करून सातत्याने मारहाण करत होता याबाबत फुलाबाई यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सातपूते यांच्याकडे धाव घेतली. याबाबत तात्काळ कारवाई होत, मारहाण करणारा मुलगा व त्याची पत्नी यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला.
अशावेळी पोलीस पाटील हे वृद्ध महिलेस न्याय देण्याचे कर्तव्य विसरून उलट वृद्ध महिला व तिचा सांभाळ करणारा मुलगा व इतर नातेवाईकांवर आरोपीच्या पत्नी मार्फत खोट्या केसेस करायला लावू का? अन्यथा केस मिटून घ्या नाहीतर चार जणांना केस करून अडकवून टाकेल. अशी बेकायदेशीर बेजबाबदार पणे वारंवार दूरध्वनीवरून धमकी दिली आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते विजयानंद हक्के यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मंगळवेढा तसेच प्रांताधिकारी आणि इतर प्रशासकीय यंत्रणांना अशा या पदाचा दुरुपयोग करून वृद्ध लोकांना मारहाण करणाऱ्या मुलाशी संगणमत करून काम करत असल्याने त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते विजयानंद हक्के यांच्याकडे संबंधित पोलीस पाटील यांची केस मिटवण्यासाठी बेकायदेशीरपणे टाकलेला दबाव याची मोबाईल वरील ऑडिओ क्लिप आहे या पोलीस पाटलावर प्रशासनाने कडक कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा हक्के यांनी दिला आहे.


















