सोलापूर : सोलापूरातून शाळा न्यायाधिकरण पुणे येथे हलविणे म्हणजे सोलापूरातील हजारो शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लाखो विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा अवमान व त्यांचे वरील आर्थिक आतंकवादच आहे. याचा आम आदमी पार्टी तीव्र शब्दात निषेध नोंदवीते व आपला हा निर्णय त्वरीत प्रशासनाने मागे घ्यावा. अन्यथा आम आदमी पार्टी संपूर्ण सोलापूर जिल्हयामध्ये रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन असा इशारा देण्यात आला. यावेळी निदर्शने करण्यात आली….
या आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष खतीब वकील, संघटन मंत्री ऍड सागर पाटील, अतिश गायकवाड, मल्लिकार्जुन पिलगेरी, सचिन व्हनमाने,अशोक व्हटकर, विनोद शिंदे, निलेश संगेपाग, विनायक पवार,अनिकेत पांढरे, शीतल पाटील यांचा सहभाग होता.

















