सोलापूर : कोव्हीड १९ पॅन्डॉमिक परिस्थितीमुळे सर्व महाविद्यालये तसेच शाळा गेली ०२ वर्षे बंद ठेवण्यात आले होते व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण दिले जात होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे व रुग्न संख्या कमी झाल्यामुळे राज्य शासनाने काही आटी व नियम घालुन महाविद्यालये चालु करण्यास परवानगी दिली आहे.
भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट सोशल सायन्सेस सोलापूर मध्ये राज्य शासनाने घालून दिलेले आटी व नियम याचे कडेकोट पालन करून ऑफलान पध्दतीने इन्स्टिटयुट चालु करण्यात आली. सकाळी विद्यार्थ्याचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्याचा स्वागतासाठी कमान उभारण्यात आली होती व रागेळी काढण्यात आली होती.
पहिल्या लेक्चरला वर्गशिक्षकांनी प्रत्येक वर्गात जाऊन कॉलेज मध्ये पॅन्डॉमिक परिस्थितीमध्ये घ्यायची काळजी यावर मार्गदर्शन केले. यावेळी संचालक डॉ. एस. बी. सावत, व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. पी. पी. कोठारी संगणक विभाग प्रमुख डॉ. ए.बी. नदाफ, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यानी विद्यार्थ्याचे स्वागत केले


















