सोलापूर : भारती विद्यापीठा अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड सोशल सायन्सेस, सोलापूर येथे ताबडया माती पासुन बनविलेल्या पर्यावरण पुरक (इको फ्रेंडली ) गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली होती. सध्याची पॅडयामिक परिस्थिती बघता कोव्हीड १९ च्या सर्व नियमावलीचे पालन करून इन्स्टिटयुट मध्ये गणेश उत्सव साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्याना इन्स्टिटयुट मध्ये येण्यास परवानगी नसल्याने विद्याथ्यानी ऑनलाईन पुजेचा लाभ घेतला. पाचव्या दिवशी इन्स्टिटयुटच्या प्रागंणातच कुंडीमध्ये पाणी घालून गणेश मुर्तीचे विसर्जन इन्स्टिटयुटचे संचालक डॉ एस. बी. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले व त्या कुडीत नवीन झाड लावण्यात आले. यावेळी संगणक विभाग प्रमुख डॉ. ए. बी. नदाफ, व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. पी. पी. कोठारी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




















