भारती विद्यापीठाचे संस्थापक भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगरावजी कदम यांच्या जयंती निमित्त दरवर्षी यशवंतराव मोहिते कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स व कॉमर्स, पुणे याच्या तर्फे दरवर्शी राष्ट्रीय स्तरावर सामान्य ज्ञान परिक्षेचे आयोजन केले जाते. या सामान्य ज्ञान परिक्षेत देशातील विविध भागातील महाविद्यालय सहभाग नोंदवतात. या सामान्य ज्ञान परिक्षेचा पेपर मध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात व या परिक्षेचा पेपर हा एम. पी. एस. सी च्या धर्ती वर काढला जातो. या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला त्यात सोलापूर विभागात भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड सोशल सायन्सेस, सोलापूर मधील एम.सी.ए भाग ०२ च्या कु रेश्मा पटेल ने प्रथम क्रमांक पटकावला.
तिच्या या यशाबद्दल इन्स्टिटयुटचे संचालक डॉ.एस.बी. सावंत यांनी तीचा बुके देऊन सत्कार केला. या वेळी आपल्या मनोगतात संचालक डॉ. एस. बी. सावंत यानी स्पर्धा परिक्षेचे महत्व व त्यातुन पुढे उपलब्ध संधी यावर आपले मत प्रकट केले. यावेळी एम.बी.ए विभाग प्रमुख डॉ. पी. पी. कोठारी, प्रा. सी. आर. सुर्यवंशी, प्रा. एम. केपाटील, प्रा. डी. डी. म्हेत्रे, प्रा. स्मिता गंभीरे, श्री. सी. ए. कदम, श्री अनंता भिलारे, सौ स्मिता पाटील कु. आरती राठोड व एम.सी.ए चे विद्यार्थी उपस्थित होते.
















