भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड सोशल सायन्सेस, सोलापूर व श्री. रामलिगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय तिर्थ याच्या सयुक्त विद्यमाने गौ, तिर्थ ता. अक्कलकोट येथे सात दिवसीय हिवाळी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीराचे उदघाटन वळसंग पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक मा. अतुल मोसले याच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष स्थानी श्री. रामलिगेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. भीमाशकर बिराजदार होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन तीर्थ च्या सरपंच आम्रपली वाघमारे व वळसंग पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. श्री. सुरवसे उपस्थित होते.
सुरुवातीला अभिजीत कदम इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. एस. बी. सावत यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले. आपल्या उदघाटनपर भाषणात डॉ. एस. बी. सावत यानी भारती विद्यापीठ भारती विद्यापीत अभिमत विश्वविद्यालय, पुणे यांच्या तर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. डॉ. सावत यांनी राष्ट्रीय सेवा योजाना विभागातर्फे वर्षे भर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजाना विभागाचे समन्वयक श्री चंद्रशेखर सुर्यवंशी यानी शिबीरात सात दिवस राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली
वळसंग पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अतुल भोसले यानी आपल्या उदघाटनपर भाषणात स्वच्छतेचे महत्व सांगितले. त्याच्या महाविद्यालयीन जिवनात राष्ट्रीय सेवा योजाना विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभाग नोंदविल्याचे सांगितले व नक्किाय उपस्थित विद्यार्था मधुन एखादा अधिकारी तयार होईल असे सांगितले. तीर्थ च्या सरपंच सौ आम्रपली वाघमारे यांनी शिवीरास शुभेच्छा दिल्या अध्यक्ष प्रा. डॉ. भीमाशकर बिराजदार यांनी आपल्या भाषणात महात्मा गाधीनी खेडयाकडे चला असा संदेश दिला असुन जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजाना विभागात सहभाग नोंदवावा व खेडेगावात जाऊन तिथल्या समस्या जानून घ्याव्यात असे सांगितले. तीर्थ हे गाव हगदारी मुक्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय तिर्थ चे प्राचार्य श्री सुधीर सोनकवडे, संगणक विभाग प्रमुख डॉ. ए.बी. नदाफ व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. ए. ए. ढवण. डॉ. पी. पी. कोठारी, डॉ. गणराज माने व राष्ट्रीय सेवा योजाना विभागातील स्वयंसेवक उपस्थित होते.

















