सोलापूर : राज्यातील आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया शुक्रवारी अचानक तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याने संपूर्ण राज्यभरात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात नाराजीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूरसह इतर जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विविध आंदोलन करण्यात आले एसटी स्टँड समोर भाजप युवा मोर्चाच्या वतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन झाले
या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर यांनी जोरदार उत्तर दिले आहे भाजपला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या विरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार नाही कोरुना सारख्या अतिशय कठीण काळात टोपे यांनी केलेलं काम केंद्राच्या आरोग्यमंत्री पेक्षाही कितीतरी सरस होते हे भाजपच्या लक्षात येत नाही का असा थेट सवाल बाबर यांनी उपस्थित केला काय म्हणाले बाबर पहा…
















