यामध्ये जिल्हा सरचिटणीसपदी शशिकांत चव्हाण, मनीष देशमुख, विकास वाघमारे व सुरेखा होळीकट्टी या ४ जणांची निवड करण्यात आली. तर १० उपाध्यक्ष, १० चिटणीस, १ कोषाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य अशा तब्बल १२० जणांच्या जंबो कार्यकारिणीची घोषणा सोलापूर येथे करण्यात आली. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घोषणा महत्वपूर्ण मानल्या जात आहेत. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा या कार्यकारिणीत समावेश आहे.
यामध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शंकरराव वाघमारे यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टीचा अंत्योदय कल्याणाचा विचार जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणककारी योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी ही कार्यकारिणी गतीने काम करेल, तसेच जिल्हाध्यक्ष या नात्याने सर्व घटकांना आणि जिल्ह्यातील सर्वांना संधी देत अत्यंत सक्षम कार्यकारिणीची घोषणा केली आहे. येणाऱ्या काळात भाजपा पूर्ण ताकदीने लोकांपर्यंत पोहचेल, शतप्रतिशत भाजपा पक्षवाढीसाठी नव्या कार्यकारिणीसह जोमाने कामाला लागणार असल्याचे मत भाजपा पूर्व सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बोलताना सांगितले.
नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे
जिल्हा उपाध्यक्ष – आप्पासाहेब बिराजदार, अपर्णा तारके, महादेव पाटील, सतीश काळे, काशिनाथ कदम, संतोष मोगले, गौरीशंकर बुरकुल, सुभाष मस्के, जिल्हा चिटणीस – परमेश्वर यादवाड, बादलसिंह ठाकूर, यतिन शहा, सिद्धेश्वर कोकरे, बसवराज शेळके, सतीश पाटील, सिद्धाराम हेले, नितीन करंडे, स्वाती रोकडे, प्रकाश घोडके तर कोषाध्यक्षपदी इंद्रजित पवार यांची निवड करण्यात आली. तसेच भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी सुदर्शन यादव, महिला मोर्चाच्या अध्यक्ष पदी प्राजक्ता बेणारे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी चांगदेव कांबळे, अल्पसंख्यांक मोर्च्याच्या अध्यक्षपदी फैज अहमद कोरबू, किसान मोर्च्याच्या अध्यक्ष पदी जगन्नाथ गायकवाड, आदिवासी मोर्चाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भोसले व भटके विमुक्त आघाडीच्या संयोजकपदी शशिकांत गावडे यांची नियुक्ती करण्यात आली.