सोलापूर – उत्तर सोलापूर तालुका येथील महिला व बालविकास विभाग संरक्षण अधिकारी अभय केंद्र कार्यालय येथील ऑपरेटर याला 500 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
किशोर सखाराम मोरे वय 28 ( पद – ऑपरेटर, महिला व बाल विकास विभाग, संरक्षण अधिकारी अभय केंद्र कार्यालय उत्तर सोलापूर) असे लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या ऑपरेटर चे नाव आहे.
यातील तक्रारदार यांच्याविरुद्ध त्यांच्या पत्नीने न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये समन्सची तारीख वाढवून देण्यासाठी व कोर्टात चांगला रिपोर्ट पाठवतो असे सांगून लोकसेवक किशोर मोरे यांनी 1500 रुपयांची लाचेची मागणी करून त्यापैकी 1000 रू स्वीकारले. उर्वरित 500 रू लाचेची पंचासमक्ष मागणी केली आहे. त्यांच्या विरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम 7, प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

















