सोलापूर : शेत मोजणीसाठी वीस हजार लाचेची मागणी करणाऱ्या माढ्याच्या भूकरमापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
प्रशांत भारतराव कांबळे, पद- भुकरमापक, वर्ग-३, भुमी अभिलेख कार्यालय, माढा असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांची मौजे रोपळे (क.) येथील गट नं. ५४५ वरील शेत जमीनीची मोजणी झाल्यानंतर सदर जमीन मोजणी व हद्द कायमचा नकाशा (क- प्रत) वर उपअधीक्षक यांची सही घेवून देण्यासाठी म्हणुन भुमी अभिलेख कार्यालय, माढा येथील भुकरमापक प्रशांत भारतराव कांबळे हे २०,००० रुपये लाचेची मागणी करीत असलेबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूरकडे दि. १०.०१.२०२३ रोजी तक्रार प्राप्त झाली होती.
सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता यातील लोकसेवक प्रशांत कांबळे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या शेतजमीनीच्या जमीन मोजणी व हद्द कायमचा नकाशा (क-प्रत ) यावर उपअधीक्षक, भुमीअभिलेख कार्यालय माढा यांची सही घेऊन देण्यासाठी २०,००० रू लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर प्रकरणात लोकसेवक प्रशांत कांबळे यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.
ही कारवाई पोनि, चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर पोलीस अंमलदार- पोअं पकाले, पोअं किणगी, चालक पोअं उडाणशिव सर्व नेमणुक लाप्रवि, सोलापूर यांनी केली.


















