सोलापूर : मराठा आरक्षण त्याला असणारे तमाम ज्ञात-अज्ञात विरोधकांचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष माऊली पवार यांनी आज दुसरा गुन्हा दाखल केला आहे.
मराठा समाजातील पोलीस अधिकारी व कर्मचारी राजकीय नेते व मराठा संघटना यांच्याबद्दल अपशब्द वापरून इतर समाजामध्ये मराठा समाजाची बदनामी करणे व मराठा समाजातील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्याबद्दल भारतीय जनतेमध्ये अपप्रचार करणे या कलमाखाली त्यांच्यावर आज फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
कायद्याचे ज्ञान असलेली व्यक्ती अशाप्रकारे विविध जाती धर्माने नटलेल्या भारतामध्ये एखाद्या समाजा बद्दल अपप्रचार करीत असेल तर ती अतिशय दुर्दैवी बाब आहे. यासाठी त्यांना अद्दल घडावी म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती सकल मराठा समाजाचे अध्यक्ष माऊली पवार यांनी दिली.



















