सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अखेर तो दिवस आला असून 1 फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेच्या वतीने प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.
या निवडणुकीमध्ये महापालिकेने सदोतीस प्रभाग हे तीन सदस्यांची असतील आणि अडतिसावा प्रभाग हा दोन सदस्यांचा असेल अशी रचना तयार केली आहेत त्या प्रारूप प्रभाग रचनेवर पंधरा दिवसात दावे व हरकती घेतल्या जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले.


















