सोलापूर : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या आठ तासांच्या इडीचौकशी नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले असून गुरुवारी सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष पवार नगरसेवक तौफिक शेख ज्येष्ठ नेते शफी इनामदार महिला शहराध्यक्ष सुनिता रोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला या आंदोलनानंतर पोलिसांनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले…

















