सोलापूर : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा सोलापूर शहरात रविवारी भव्य अशा मिरवणुकीने सांगता होणार आहे. शेकडो मंडळे या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात सुमारे बारा तास ही मिरवणूक चालते. दरम्यान यंदा पोलीस प्रशासनाने डॉल्बी साऊंड सिस्टिम मला परवानगी नाकारली आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवरच ही मिरवणूक होणार आहे. परंतु या मिरवणुकीची सर्वस्व जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव व विश्वस्त समितीने घेतली आहे. दरम्यान मिरवणूक मार्गावर पोलीस प्रशासनाने आपला मोठा बंदोबस्त आयोजित केला आहे. त्यामध्ये तीन पोलीस उपायुक्त, सात सहाय्यक पोलीस आयुक्त, 25 पोलीस निरीक्षक, 63 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, एस आर पी एफ तुकडी, महिला पोलीस, होमगार्ड असे सुमारे अठराशे पोलिसांचा ताफा या मिरवणुकीवर लक्ष ठेवून असणार आहे.



















