सोलापूर : डॉक्टर वैंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूरचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांची औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पदी बदली झाली आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने आठ एप्रिल दोन हजार बावीस रोजी आदेश काढून ही बदली केली प्रशासकीय कारणात्सव डॉक्टर संजीव ठाकूर यांची बदली झाली असून
डॉ. संजीव ठाकूर यांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्यात येत आहे. डॉ. संजीव ठाकूर यांनी अधिष्ठाता पदाचा कार्यभार डॉ. एस. वी. आंबेकर, प्राध्यापक, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्याकडे सोपवावा आदेशात म्हटले आहे.
अधिष्ठाता पदावर काम करताना डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेक सुधारणा केल्या, अधिष्ठाता कार्यालयात कमी आणि सिव्हिल हॉस्पिटलमधील शस्त्रक्रिया विभागात ते जास्त वेळ दिसत असत ,अनेक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या, शस्त्रक्रियांची अत्याधुनिक मशिनरी बसवली, विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या दोन्ही लाटेमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हजारो लोकांचे जीव वाचवले त्यामध्ये डीन म्हणून डॉक्टर ठाकूर यांचे काम त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरले आहे. आपल्या मुलाला बेकायदेशीरपणे ऑपरेशन थिएटर मध्ये इंट्री देऊन त्याच्या कडून ऑपरेशन करून घेतल्या प्रकरणी ते वादाच्या भोवऱ्यात सुद्धा अडकले होते.



















