सोलापूर : राज्यपाल भगतसिंग कोशारी हे शुक्रवारी सोलापूर आले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापुरात शिवप्रेमींनी आसरा चौकांमध्ये निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. त्या पद्धतीने हजारावर शिवप्रेमी आसरा चौकात जमा झाले, पोलिसांनी त्यांना एका बाजूला अडवले होते. राज्यपाल कोशारी यांचा ताफा दहा वाजून 40 मिनिटांनी आसरा चौका मधून पास झाला. त्यावेळेस एका बाजूला अडवलेल्या शिवप्रेमींनी भगवे झेंडे दाखवत जोरदार निदर्शने केली कोशारी यांनी चौकातून वळताना बाजूला थांबलेल्या नागरिकांना पाहून हात दाखवत वंदन केले पहा हा व्हिडीओ

















