सोलापूर : फौजदार चावडी पोलीस ठाण्याने अटक केलेल्या पाच संघटीत गुन्हे करणाऱ्या आरोपींना पोलीस आयुक्तांनी मोक्का कलम लावले होते. जेलमध्ये त्यापैकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह झाला होता, त्याला कोरोन्टाईन सेंटरमध्ये वेगळे ठेवले होते तो तिथून पोलिसांची नजर चुकवून पसार झाला आहे.
संतोष संजय कांबळे, वय २९ वर्ष, रा. जय मल्हार चौक सोलापूर असे त्या आरोपीचे नाव आहे. पोकॉ समाधान दामोदर लेंडवे, वय ३५ वर्षे नेम- फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
यात हकिकत अशी की, वरील वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी व पोकॉ संभाजी जोशी, हे शासकीय तंत्र निकेतन कॉरंटाईन सेंटर शांती चौक जवळ, सोलापूर याठिकाणी खालील गेटवर पहारा देत असताना कॉरंटाईन सेंटर मधील पहिल्या मजल्यावरील खोलीत असलेला फौजदार चावडी महा संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधि क ३(१) (२). ३ (२).३(४), मधील आरोपी संतोष कांबळे हा खोलीतून पळाला असे एका आरोपीने जोरात ओरडुन सांगीतले, म्हणून फिर्यादी लागलीच वरच्या मजल्यावर जावून पाहिले असता वरील आरोपी हा बेडीतून हात काढून पळुन गेला होता. लागलीच फिर्यादी हे कॉरोटांईन सेंटरचे इतर खोलीत आजु बाजुस त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही म्हणून फिर्यादीची खात्री झाली की वरील आरोपीत हा फिर्यादीचे कायदेशीर रखवालीतुन पळुन गेला आहे अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.


















