सोलापूर : मुंबईचे भाजप नेते मोहित कंबोज यांच्या माध्यमातून राज्यभरात भोंग्यांच वाटप केले जात आहे, कंबोज यांना एक मेल केला की लगेच भोंग्याचा सेट दाखल होतो. सोलापुरातील पावन मारुती मंदिर ट्रस्टचे राम जाधव यांनी भोंगा मागविला होता, तो भोंगा सोलापुरात दाखल झाला आहे, यामध्ये भोंगा, एंपलीफायर, वायर, हनुमान चालीसा असलेले पेन ड्राइव असा सेठ आला आहे. त्या शिवाय सोलापूर शहर आणि जिल्हयात आठ हनुमान मंदिरांसाठी भोंगे पाठवण्यात आले आहेत.
पावन मारुती मंदिर जुनी पोलीस लाईन, विडी घरकुल, शेळगीत भोंगे दाखल झाले असून, ग्रामीणमध्ये अकलूज, अक्कलकोट अन माळशिरसला देखील भोंगे पाठवल्याची माहिती मिळाली. जिल्ह्या जिल्ह्यात भोंगे – वाजवण्याच्या परवानगीचा प्रश्न ऐरणीवर असून विना परवाना हनुमान चाळीसा लावण्यावरुन पोलिसांवर अतिरिक्त ताण पडणार असून, पोलिसांनी जर त्रास दिला तर येणाऱ्या काळात सर्व मंदिरांना भोंगे वाटू असा इशारा पावन मारुती मंदिराचे सदस्य आणि भाजप नेते किरण पवार यांनी दिला…
दरम्यान या मंदिराला आमदार विजयकुमार देशमुख यांनी देखील भेट दिली. जर पोलिसांनी जबरदस्तीने भोंगे काढण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल असा इशारा भाजप आमदार देशमुख यांनी दिलाय.



















