सोलापूर : बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्यावतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त नियोजन बैठक आणि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ आंबेडकरीं नेते पी आर बनसोडे होते. यंदाच्या जयंती उत्सव मंडळात दोन मुस्लिम चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित भीमसैनिकांमधून अध्यक्षपदासाठी नावे मागवण्यात आली. त्यानंतर ट्रस्टी अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. या बैठकीत 132 व्या जयंती उत्सव अध्यक्षपदी सुहास सावंत, सचिवपदी दत्ता शिंदे, कार्याध्यक्ष पदावर रसूल पठाण, ऑडीटर पदी दीपक गवळी, उपाध्यक्ष पदी बाळासाहेब बनसोडे, शांताताई कांबळे, काजल क्षीरसागर आणि खजिनदार म्हणून अयाज दीना यांच्या निवडी करण्यात आल्या.
या बैठकीला आनंद चंदनशिवे, ट्रस्टी अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, सचिव केरू जाधव, मावळते उत्सव अध्यक्ष रॉकी बंगाळे, रसूल पठाण, अजित बनसोडे, मिलिंद प्रक्षाळे, महाराज चंदनशिवे, सिद्धेश्वर पांडगळे, दीपक गवळी, रविकांत कोळेकर, अनिल वाघमारे, बाबा बाबरे, शांतिकुमार नागटीलक, दीपक बनसोडे, लखन भंडारे, श्रीमंत लोंढे, सुहास सावंत, विनोद वाघमारे, आशुतोष नाटकर, दत्ता शिंदे, लखन भंडारे, शिरीष सर्वगोड यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते.
आनंद चंदनशिवे म्हणाले, सोलापुरात दहा दिवस विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा होणार आहे. मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने या दहा दिवसात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या मिरवणुकीमध्ये भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.


















