सोलापूर : अॅट्रॉसिटीचा चुकीचा गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी जेलरोडचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांना निलंबित केले आहे.
सहा महिन्याकरिता राहण्यासाठी आलेल्या तिघा जणांनी जागा बळकावण्यासाठी तक्रारदार हे अपंग व मागासवर्गीय असल्याची माहिती असतानादेखील त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली होती. या प्रकरणांमध्ये दिनांक 5 एप्रिल रोजी जेलरोड पोलीस ठाण्यात त्या तीन जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.
जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी एका जागेच्या गुन्ह्यामध्ये चुकीची कारवाई केली ते तपासात उघड झाले त्यावरून पोलीस दलाची बदनामी झाली आणि जनमानसामध्ये पोलीसांबद्दलची प्रतिमा मलीन झाली असा ठपका ठेवून पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांना पोलीस दलातून निलंबीत केले.
पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी त्यांच्या सहा महिन्याच्या कार्यकालात अनेक जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे त्यातच आता पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांची भर पडली आहे.


















