सोलापूर : चोरीच्या विविध पाच गुन्ह्यांमध्ये सोलापूर शहर पोलिसांकडे अटकेत असलेल्या पारधी समाजातील युवकाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रविवारी रात्री सातच्या सुमारास मृत्यू झाला.
भीमा काळे राहणार कुर्डूवाडी असे मयत आरोपीचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि सात मुले असा परिवार आहे. मयत आरोपी भीमा काळे हा महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांचा नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे. विजापूर नाका पोलीसांनी भीमा काळे याला चोरीच्या विविध पाच गुन्ह्यांमध्ये अटक केले होते दरम्यान त्याची तब्येत बिघडल्याने मागील आठ दिवसांपासून सिव्हील हॉस्पिटल मधील बी ब्लॉक मध्ये त्याला उपचारासाठी ठेवण्यात आले होते. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उपचारादरम्यान भीमा काळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळताच त्याची पत्नी आणि चार मुलांनी सिव्हिल हॉस्पिटल मध्येच टाहो फोडला त्यांच्यासोबत आरोपीचे वकील एडवोकेट राजेंद्रसिंह बायस उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना आरोपीची पत्नी आणि एडवोकेट बायस यांनी पोलिसांच्या मारहाणीतच भीमा काळे याचा मृत्यू झाल्याचा थेट आरोप केला….पहा हा व्हिडीओ


















