सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रस्ते या विषयावर बराच वेळ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मार्ग, पालखी मार्ग, मुरूम वाहतूक होणारे मार्ग, रस्ते मंजूर आहेत मात्र काम न सुरू झालेल्या रस्त्यावर आमदारांनी आवाज उठवला. मंजूर रस्ते मात्र काम न सुरू झालेले, अर्धवट राहिलेले रस्ते यावर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आक्रमक दिसले, अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. याविषयात गोंधळ उडाला, आमदार राऊत यांनी जिल्हा नियोजन समिती मध्ये स्थानिक विषय मार्गी लागत नसतील तर काय उपयोग, अध्यक्ष म्हणून तुमचा काय फायदा या शब्दात राऊत यांनी संताप व्यक्त केला. या बोलण्यावर पालकमंत्री भरणेमामा संतापले ते आपल्या जागेवरून उठले आणि राऊत तुम्ही खाली बसा, म्हणून सुनावले, यावर स्वभावाने रागीट असलेल्या राजाभाऊ यांनी ही मामांना सडेतोड बोलण्यास सुरुवात केली यावेळी एकच गोंधळ उडाला पहा हा व्हिडीओ….
















