देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवार 20 मे रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर हे प्रमुख अधिकारी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मिटींगला असतील. संपूर्ण देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आहे, मृत्युदर वाढतोय मात्र बरे होणाऱ्यांची संख्याचे प्रमाणही चांगले आहे, मागील काही दिवसात ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा, बेडची कमतरता भासली. तसेच लसीचा सुध्दा मोठा तुटवडा आहे, परंतु या मागील आठ दिवसात ऑक्सिजन बेड रेमडेसिविर इंजेक्शन ओरड कमी झाल्याचे चित्र आहे, एकीकडे असे चित्र असताना कोरूनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा होत आहे ,यामध्ये विशेष करून 0 ते 18 वयोगटातील बालके यांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याच बरोबर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता बुरशीजन्य म्युकर मायकोसिस हा डोळ्यांचा आजार होऊ लागला आहे, आता या बुरशीजन्य आजारासाठी औषधे इंजेक्शनची गरज भासत आहे, ती सुद्धा महागडी इंजेक्शन आहेत, सोलापूर जिल्हयातील पंढरपूर व बार्शीमध्ये म्युकर मायकोसिस या आजाराचे 2 रुग्ण आढल्याची माहिती समोर आली आहे,
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आढावा बैठकीत महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे, लसीकरणाची माहिती घेतली जाईल , मृत्युदर कमी करण्याच्या सूचना होतील, या बैठकीला सोलापूर जिल्ह्यासह चंद्रपूर, अहमदनगर, नाशिक, सातारा, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, अमरावती, वर्धा, पालघर, उस्मानाबाद, जालना, लातूर, नागपूर, परभणी व बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे.




















