सोलापूर : शिवसेनेचे नगरसेवक मनोज शेजवाळ यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे महापालिकेच्या तोंडावरच त्यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे चित्र आहे. दरम्यान याच्या शनिवारी दिवसभर बातम्या छापून आल्या सायंकाळच्या सुमारास स्वतः नगरसेवक मनोज शेजवाळ यांनी आपला व्हिडिओ प्रसारमाध्यमांना पाठवला. त्यामध्ये आपली बाजू मांडताना मी सोलापुरात नसताना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र रामलिंग सकट व त्याची पत्नी हे दोघे ब्लॅकमेलर आहेत जाणीवपूर्वक त्या भागातील लोकांना त्रास देतात पोलीस प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली…

















