सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध प्रक्रिया उत्पादक संघाच्या निवडणुक अर्ज छाननी दिवशी माजी अध्यक्ष दिलीप माने, राष्ट्रवादीचे काका साठे, संचालक बबनराव आवताडे, जिल्हा परिषद सदस्य रणजीतसिंह शिंदे, संचालक योगेश सोपल, संचालक दिपक माळी यांच्यासह 33 जणांवर हरकती दाखल झाल्या आहेत. त्याची सुनावणी दुपारी तीन नंतर घेण्यात येणार असून या हरकतींवर निकाल मंगळवारी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिली.
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या सतरा संचालक मंडळाच्या जागेसाठी क्रियाशील संस्था सभासदांनी निवडलेले प्रतिनिधी या मतदारसंघाच्या 12 जागांसाठी 68 अर्ज, महिला प्रतिनिधी मतदार संघाच्या दोन जागेसाठी 34 अर्ज, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 1 जागेसाठी 5 अर्ज, इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या एक जागेसाठी 13 तर त्या विमुक्त जाती प्रवर्गाच्या 1 जागेसाठी 17 अर्ज दाखल झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे, सहाय्यक निवडणूक अधिकारी आबा गावडे यांच्या उपस्थितीत दूध संघाच्या सभागृहात सोमवारी सकाळी अर्ज छाननी प्रक्रिया घेण्यात आली. या छाननीत महिला मतदार संघातील तीन उमेदवारांवर हरकत घेण्यात आली तसेच इतर मागासवर्गीय मतदार संघातील सहा उमेदवारांवर हरकत आली आहे तर क्रियाशील संस्था मतदार संघातून चोवीस जणांवर हरकत घेण्यात आली असून ती नावे पुढील प्रमाणे आहेत.
■क्रियाशील संस्था सभासदांनी निवडलेले प्रतिनिधी मतदारसंघ
अलका बंडगर, ज्योती सावंत, नारायण गुंड, विकास गलांडे, हनुमंत पोटरे, दिपक माळी, विजय येल्पले, दाजी दोडतले, सिद्धेश्वर आवताडे, बबन अवताडे, बळीराम साठे, संतोष वावरे, योगेश सोपल, वालचंद मुंडे, रंजीतसिंह शिंदे, दिलीप माने, प्रभाकर कोरे, ललिता लवटे, सरस्वती भोसले, कौशल्या नवले, संताजी पाटील, तायप्पा गरंडे, संगीता लोंढे, पांडुरंग भाकरे.
■महिला मतदारसंघ
रेवती साखरे, सरस्वती भोसले, कौशल्या नवले.
■ओबीसी मतदार संघ
विकास गलांडे, दिपक माळी, ज्योती सावंत, रंजीतसिंह शिंदे, प्रभाकर कोरे, शहाजी पाटील.


















